लासलगांव मंडईत कांद्याच्या दारात क्विंटलमागे १५० रुपयांची घसरण.

लासलगांव मंडईत कांद्याच्या दारात क्विंटलमागे १५० रुपयांची घसरण.

324

मुंबई:  नाशिक जिल्ह्यातील  लासलगाव मंडई ही कांदा निर्यातीसाठीची मुख्य बाजारपेठ आहे.  कांद्याच्या होणाऱ्या निर्यातीवरील बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील  लासलगाव मंडईत मंगळवारी कांद्याचे भाव प्रति क्विंटल १५० रुपयांनी घसरण दिसून येत आहे . देशातील सर्वात मोठी घाऊक कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे 19 फेब्रुवारी रोजी मोडल घाऊक कांद्याचे भाव 40.62 टक्क्यांनी वाढून 1,800 रुपये प्रति क्विंटल झाले होते, ज्यांचा दार 17 फेब्रुवारीला 1,280 रुपये प्रति क्विंटल होता.

KhetiGaadi always provides right tractor information

मात्र, मंगळवारी झालेल्या  लिलावात 8,500 क्विंटल कांद्याचे भाव प्रतिक्विंटल 150 रुपयांनी कमी होऊन सरासरी 1,650 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे . लासलगाव एपीएमसीचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी पीटीआयला सांगितले की, “गेल्या आठवड्यात भाव थोडे वाढले होते, परंतु , कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याबाबत कोणताही सरकारी ठराव (GR) किंवा घोषणा न झाल्याने ते स्थिर झाल्याचे दिसून येत आहेत.”

Khetigaadi

आदल्या दिवशी, ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, “कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. ती लागू आहे आणि स्थितीत कोणताही बदल झालेला नाही.”

ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग म्हणतो, “ग्राहकांना वाजवी दरात कांद्याचं पुरेशी घरगुती उपलब्धता सुनिश्चित करणं, हे सरकारचं सर्वोच्च प्राधिकृत्य आहे.” असे ते म्हणाले. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी, 31 मार्चनंतरही बंदी उठवली जाण्याची शक्यता नाही कारण रब्बी (हिवाळी) कांद्याचे उत्पादन कमी क्षेत्रफळामुळे, विशेषतः महाराष्ट्रात कमी होण्याची अपेक्षा आहे, सूत्रांनी सांगितले.

रब्बी हंगामा  2023 चे  कांद्याचे उत्पादन हे 22.7 दशलक्ष टन होण्याचा अंदाज होता. तरी कृषी मंत्रालयाचे अधिकारी येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या  प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये रब्बी कांद्याच्या व्याप्तीचे मूल्यांकन करतील.

 दरम्यान, आंतर-मंत्रालय गटाच्या मंजुरीनंतर मित्र देशांना कांद्याच्या निर्यातीला केस-टू-केस आधारावर परवानगी दिली जाईल.



अधिक जानकारी के लिए डाउनलोड कीजिए खेतिगाडी ऍप. 

agri news

To know more about tractor price contact to our executive

Leave a Reply