नेटाफिमची एकात्मिक ऊस व्यवस्थापन शिखर परिषद संपन्न, ५० पेक्षा अधिक ऊस कारखाने आणि ८० पेक्षा उद्योग तज्ज्ञांची उपस्थिती.
KhetiGaadi always provides right tractor information
पुणे, २२ फेब्रुवारी २०२५ : स्मार्ट सिंचन उपायांचा अग्रगण्य पुरवठादार असलेल्या नेटाफिम इंडियाने पुण्यात ठिबक फर्टिगेशन आणि ऑटोमेशन अंतर्गत एकात्मिक ऊस व्यवस्थापनावर दोन दिवसीय शिखर परिषद आयोजित केली होती. या परिषदेत ५० पेक्षा अधिक ऊस कारखाने आणि ८० पेक्षा उद्योग तज्ज्ञ आणि कृषी तज्ज्ञांनी अचूक सिंचन, फर्टिगेशन आणि ऑटोमेशनद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्याच्या धोरणांवर चर्चा केली.
मान्यवरांची उपस्थिती
परिषदेची सुरुवात उद्घाटन समारंभाने झाली. यावेळी महाराष्ट्राचे माजी साखर आयुक्त आणि पुणे येथील यश दाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) चे अध्यक्ष, आणि नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज धाराशिवचे सीएमडी भैरवनाथ भगवानराव ठोंबरे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे मिशन संचालक आणि फलोत्पादन संचालक डॉ. के. पी. मोटे, पुणे कृषी महाविद्यालयाचे असोसिएट डीन डॉ. महानंद शिवाजीराव माने, आरसीएसएम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, कोल्हापूरचे असोसिएट डीन डॉ. रवींद्र दलपतराव बनसोड, पाडेगाव येथील केंद्रीय ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. आर. एल. भिलारे आणि डॉ. व्ही. प्रवीण राव, सल्लागार, सीआयआय तेलंगणा कृषी आणि अन्न प्रक्रिया पॅनेल आणि कुलगुरू, कावेरी विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय ठिंबक सिंचन सल्लागार आणि माजी कुलगुरू पीजेटीएसएयू आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात ऊस सिंचन क्रांतीचे नेतृत्व नेटाफिम इंडियाने केले
नेटाफिम इंडियाचे विकास सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृष्णात महामूलकर, व्यवसाय विभाग प्रमुख, मध्य व उत्तर भारत नेटाफिम इंडिया आणि अरुण देशमुख, मध्य व उत्तर भारत कृषी विभाग प्रमुख नेटाफिम यांनी महाराष्ट्राच्या विकसित होत असलेल्या ऊस शेतीबद्दल माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी पीक उत्पादन आणि उत्पन्न सुरक्षितता वाढवण्यासाठी स्केलेबल सिंचन उपायांची आवश्यकता यावर भर दिला.
ऊस उत्पादकांसाठी संधी: नेटाफिमच्या शिखर परिषदेत तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन
जागतिक साखर उत्पादनात भारताचा २० टक्के वाटा असून ५२० हून अधिक साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यामुळे वाढत्या देशांतर्गत आणि जागतिक मागणीला पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादनाचे आधुनिकीकरण करण्याची तातडीची गरज आहे. २०२३-२४ पर्यंत महाराष्ट्रातील ऊस लागवड क्षेत्र १४.१ लाख हेक्टर होते. यापैकी फक्त ४ लाख हेक्टर ठिबक सिंचनाखाली आहे. यामुळे उत्पादकता वाढण्याची मोठी संधी आहे. आकडेवारीवरून असेही दिसून येते की, राज्यात उसाची उत्पादकता प्रति हेक्टर ७८ टनांवर स्थिरावली आहे. तर साखरेचा उतारा देखील याच काळात १०.३ टक्क्यांवर स्थिरावला. हवामान बदल, अनियमित पाऊस आणि पाण्याचा ताण यामुळे उत्पादनातील आव्हाने आणखी वाढली आहेत.
ऊस उत्पादन वाढवण्यासाठी ठिबक सिंचन व ऑटोमेशन महत्त्वाचे – नेटाफिम इंडिया
चर्चेदरम्यान तज्ञांनी ठिबक सिंचन, सुधारित उसाच्या जाती, प्रगत कृषी रसायने, ऑटोमेशन सोल्यूशन आणि चांगले शेती व्यवस्थापन हे उच्च उत्पादकता साध्य करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. आकडेवारीवरून असे दिसून येते की केवळ ठिबक सिंचनामुळे दर हंगामात २१२ टीएमसी पाणी वाचले आहे. तर उत्पादनात १ कोटी टन वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दर हंगामात सुमारे ३,००० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. उर्वरित १० लाख हेक्टरपर्यंत ठिबक सिंचनाचा विस्तार केल्यास राष्ट्रीय साखर उत्पादन आणि संसाधन कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढू शकते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा
महाराष्ट्रातील काही भागात प्रति एकर १३०-१४० टन उत्पादन नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ठिबक सिंचनाची क्षमता दर्शवितात. ऑटोमेशन, प्रगत सिंचन आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब वाढवणे, उच्च-उत्पादन, संसाधन-कार्यक्षम शेतीमध्ये राज्याला एक बेंचमार्क म्हणून स्थापित करू शकते. महाराष्ट्राचे कृषी परिदृश्य परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. मराठवाडा आणि विदर्भ हे प्रमुख विकास केंद्र म्हणून उदयास येत आहेत. तर पश्चिम महाराष्ट्राचे सेवा क्षेत्र येत्या काळात युरोपियन मानकांना टक्कर देण्यास सज्ज आहे.
सरकारी धोरणे, उद्योग उपक्रम आणि तांत्रिक प्रगती
सरकारी धोरणे, उद्योग उपक्रम आणि तांत्रिक प्रगती एकत्रित होत असताना ऊस उत्पादकता आणि स्थिर उत्पन्नाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. ठिबक सिंचन आणि परिसंस्थेवर आधारित उपायांकडे धोरणात्मक पाऊल टाकल्याने महाराष्ट्राचे ऊस उत्पादन केवळ उंचावले जाऊ शकत नाही तर दीर्घकालीन कृषी शाश्वतता आणि शेतकरी समृद्धी सुनिश्चित करून जागतिक साखर पॉवरहाऊस म्हणून भारताचे स्थान देखील मजबूत होऊ शकते.
नेटाफिम इंडियाबद्दल
नेटाफिम इंडिया ही शाश्वत उत्पादकतेसाठी स्मार्ट सिंचन उपायांमध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या नेटाफिमची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. 1965 साली इजराईल मध्ये स्थापन झालेली कंपनी 1997 साली भारतामध्ये आली. नेटाफिम इंडिया सूक्ष्म-सिंचन, हरितगृह, डिजिटल शेती उपाय आणि सामुदायिक सिंचन प्रकल्पांची विस्तृत श्रेणी देते. सर्व प्रमुख राज्यांमध्ये ३ उत्पादन प्रकल्प, २५०० हून अधिक कर्मचारी आणि २५०० हून अधिक डीलर्सच्या विशेष नेटवर्कसह नेटाफिम इंडियाने गेल्या काही वर्षांत विविध पिकांच्या श्रेणीसाठी १.१ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त जमिनीसाठी सिंचन व्यवस्था प्रदान केली आहे. कंपनीने आजपर्यंत १० लाखाहून अधिक शेतकरी कुटुंबांना शाश्वत समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी व्यापक कृषीशास्त्र, डिझाइन, विक्रीनंतरचे समर्थन आणि कृषी-विस्तार सेवा यशस्वीरित्या प्रदान केल्या आहेत. नेटाफिम इंडिया ही GGRC, APMIP आणि TANHODA सारख्या अनेक सरकारी प्रकल्पांमध्ये सक्रिय भागीदार आहे.
अधिक माहिती आणि तपशीलांसाठी लॉग ऑन करा : www.netafimindia.com
अधिक माहितीसाठी, कृपया डेन्ट्सू क्रिएटिव्ह पीआर येथे संपर्क साधा : +९१ ९८३३००४४८२ | sneha.joshi@dentsu.com
शेती विषयक नवोपक्रम आणि सरकारी योजनांविषयी नवीनतम माहिती मिळवण्यासाठी खेतीगाडी व्हाट्सअॅप चॅनेलशी कनेक्ट रहा. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी खेतीगाडीला भेट द्या.
शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी योजनांवरील मार्गदर्शन आणि अपडेटसाठी खेतीगाडीशी संपर्क साधा:
फोन: 07875114466
ईमेल: connect@khetigaadi.com
To know more about tractor price contact to our executive