‘झारसीम कोंबडी’ मिळवून देणार ‘हँडसम उत्पन्न’
झारखंड येथील बिरसा कृषी विद्यापीठाने वर्षाला सरासरी १७० अंडी देणा्या देशी कोंबडी ची जात विकसित केली आहे. कृषीप्रधान असलेल्या भारतात शेतीला पूरक म्हणून अनेक शेतकरी पशूपालन, कुक्कुटपालन व्यवसाय करतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन हा कमी खर्चाचा आणि उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ओढा कोंबडीपालनाकडे असतो. मात्र, कुक्कुटपालनात खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी स्थिति निर्माण होऊ शकते, तसेच कोंबड्यांच्या देखभळीचा आणि आरोग्याचा खर्च जेवढा येतो त्या तुलनेत त्यांच्यापासून मिळणारी अंडी मुबलक असतीलच असे नहो. त्यामुळे अनेकदा या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना नुकसानही सहन करावे लागते.
KhetiGaadi always provides right tractor information
याच विरोधाभासावर तोडगा शोधून काढण्यामध्ये आता देशाच्या कृषी विद्यापीठातील तज्ञांना यश आलेले आहे. कमी खाद्य सेवन करणारी, मर्यादित देखभाल खर्च असलेली परंतु वर्षभरात मुबलक अंडी देणारी देशी कोंबडीची एक नवीन जात विकसित करण्यात आली आहे. या अंड्यांचा आकार देखील नेहमीच्या तुलनेत मोठा असल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास, कृपया तुमच्या KhetiGaadi सल्लागारांशी 07875114466 या क्रमांकावर कॉल करा किंवा connect@khetigaadi.com वर ईमेल लिहा.
दरवर्षी १७० अंडी
झारखंड येथील बिरसा कृषी विद्यापीठाने अलीकडेच् एका विशिष्ट प्रकारच्या देशी कोंबडीची जात विकसित केली आहे. ही कोंबडी वर्षाला सरासरी १७० अंडी देत असल्याचे प्रयोगातून आढळून आले आहे. देशी कोंबडीच्या या जातीचे नाव झारसिम ठेवण्यात आले आहे. स्थानिक आदिवासी बोलीतील सीम या शब्दाचा अर्थ कोंबडी असा होतो. म्हणूनच झारखंड मधील ‘झार’ आणि ‘सिम’ यांना मिळून ‘झारसिम’ असे या कोंबडीचे नाव ठेवण्यात आले आहे. अन्य देशी कोंड्यांच्या तुलनेत ही एक कोंबडी संख्येने दुप्पट अंडी देते. शिवाय ही अंडी नेहमीच्या तुलनेत आकाराने मोठी देखील असतात, ज्यामुळे त्यांना बाजारात विक्रीसाठी चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच जन्मानंतर या कोंबडीपासून १८० दिवसांतच अंडी उत्पादन सुरू होते.
अधिक प्रथिनांनी युक्त
झारसिम कोंबडीची सर्वात खासियत म्हणजे ही आकर्षक आणि बहुरंगी असते. तसेच या कोंबडीचा जीवनकाळही अधिक दिवसांचा असतो. या कोंबडीच्या अंड्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्या जोडीला या कोंबडीचे मांस उत्पादनही अधिक असते.
पावसाळ्यात कोंबड्यांची कशी काळजी घ्याल?
पावसाची दिशा आणि वाऱ्याचा वेग याचा विचार करूनच पोल्ट्री शेड शक्यतो पूर्व पश्चिम बांधलेले असावे. या शेडवरील पत्रा पावसाळा सुरू होण्यापूर्वी नीट शाकारून घ्यावा, मजबूत बांधून घ्यावा. पक्ष्यांच्या खाद्याची साठवणूक फक्त एक आठवड्यांसाठी करावी. जास्त दिवस खाद्य साठवून ठेवल्यास त्यामध्ये बुरशी होण्याचा धोक वाढतो. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. खाद्यामध्ये जर खूप जास्त गाठी झाल्यास असे खाद्य कोंबड्यांना देऊ नये.
देशातील कष्टकरी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा विविध पीक पद्धती, उत्पन्न वाढ योजनांची माहिती मिळवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना आणि इतर सरकारी योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी आमच्या whatsapp चॅनेलच्या माध्यमतून आमच्याशी सतत संपर्कात रहा. कृषीविषयक अधिक तपशीलवार माहितीसाठी, नियमितपणे KhetiGaadi ला भेट द्या!
To know more about tractor price contact to our executive