आयशर ट्रॅक्‍टर्सने लाँच केली आहे प्राइमा G3 – नवीन युगातील शेतकऱ्यांसाठी प्रीमियम ट्रॅक्‍टर रेंज

आयशर ट्रॅक्‍टर्सने लाँच केली आहे प्राइमा G3 – नवीन युगातील शेतकऱ्यांसाठी प्रीमियम ट्रॅक्‍टर रेंज

894
  • प्रीमियम स्टाइलिंगसह जागतिक दर्जाचे डिझाइन
  • प्रगत तंत्रज्ञानासह उत्कृष्ट बनावट, उत्तम फिट आणि कार्य क्षमता
  • सर्वोत्तम आरामासाठी उच्च आसन, मोठे आणि आरामदायक प्लॅटफॉर्म आणि वन-टच फॉरवर्ड ओपनिंग बोनेट

मे  ०९, २०२२ | भोपाळ : जगातील तिसरी सगळ्यात मोठी निर्माता, टॅफे – ट्रॅक्‍टर्स अॅण्‍ड फार्म इक्विपमेंट लिमिटेड समूहाच्या आयशर ट्रॅक्‍टर्सने आयशर प्राइमा G3 सीरीज़ लाँच करण्याची घोषणा केली. प्रीमियम ट्रॅक्‍टरची पूर्ण एक नवीन रेंज आयशर प्राइमा G3 सीरीज नवीन युगातील भारतीय शेतकऱ्यांना लक्षात घेऊन निर्मित केली आहे, ज्यांना सर्वोत्तम स्टाइल, कार्यक्षम आणि बळकट ट्रॅक्टर हवे आहेत त्यांच्यासाठी. आयशर प्राइमा G3 ४०-६० एच.पी. रेंज मध्ये ट्रॅक्टराची एक नवी सिरीज आहे, जी दशकांच्या अनुभवासह विकसित केली आहे, सोबतच ही  ट्रॅक्‍टर सीरीज  शानदार स्टाइलिंग, उन्नत टेक्नोलॉजी आणि आराम प्रदान करते.

KhetiGaadi always provides right tractor information

आयशर प्राइमा G3 सीरीज़ ला लाँच करताना टॅफेच्या सी.एम.डी. मल्लिका श्रीनिवासन म्‍हणाल्‍या “दशकांपासून आयशर ब्रँड, निःसंशयपणे, कृषी आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांमध्ये विश्वास, विश्वासार्हता, मजबूतपणा आणि अष्टपैलुत्व यासाठी ओळखला जातो. प्राइमा G3 लाँच केल्याने आधुनिक भारतातील प्रगतीशील शेतकर्‍यांना अधिक उत्पादनक्षमता, आराम आणि कार्य सुलभतेचे फायदे मिळतील. त्याच वेळी, त्यांना कमी किंमतीत अधिक परतावा मिळण्याचा पण पर्याय मिळेल, जे नेहमीच आयशरचे वचन आहे.”

नवीन प्राइमा G3 नवीन युगातील एरोडायनॅमिक बोनेटसह येते जे ट्रॅक्‍टरला एक अद्वितीय, शानदार स्टाइल प्रदान करते आणि वन-टच ओपन, सिंगल पीस बॉनेट इंजन पर्यंत पोहचण्यास मदत करते, ज्यामुळे ट्रॅक्टरची देखभाल करणे सोपे होते. उच्च तीव्रतेची ३डी कूलिंग टेक्नोलॉजी सोबत बोल्ड ग्रिल, रॅप-अराउंड हेडलाइट आणि डिजी-NXT डॅशबोर्ड दिसण्यामध्ये आकर्षकता प्रदान करतात आणि अधिक क्रॉस-एअर फ्लो देतात, ज्यामुळे ट्रॅक्‍टरला  दीर्घकाळ चालवणे शक्य होते.

Khetigaadi

टॅफे मोटर्स अॅण्‍ड ट्रॅक्‍टर्स लिमिटेड (टी.एम.टी.एल.) च्या डिप्टी एम.डी., डॉ. लक्ष्मी वेणु म्‍हणाल्‍या “भारतातील तरुण आणि प्रगतीशील शेतकरी तंत्रज्ञान आणि कृषी-तांत्रिक उपायांवर लक्ष केंद्रित करून शेती कार्यामधून जास्तीत जास्त नफा मिळवू इच्छितात आणि त्यांच्यासाठी प्राइमा G3 शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी एक आदर्श भागीदार म्हणून भूमिका बजावेल.”

ग्राहकांना लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली आयशर प्राइमा G3 रेंज मध्ये हाय टॉर्क – फ्यूएल सेवर (एच.टी.-एफ.एस.) लिक्विड कूल्ड इंजन आहे जे उत्तम परफॉर्मन्‍स आणि इंधनाची जास्त बचत प्रदान करते. यामधील कॉम्बीटॉर्क ट्रांसमिशन अधिक शक्ती, टॉर्क आणि उत्पादकता प्रदान करण्यासाठी इंजन आणि ट्रांस-एक्सल सोबत परिपूर्ण संयोजन प्रदान करते. नवीन मल्टीस्पीड पी.टी.ओ. ४ विविध पी.टी.ओ. मोडची विशिष्ट सुविधा देतात. ज्यामुळे आयशर प्राइमा G3 विविध प्रकारच्या कृषी आणि कमर्शियल कार्यांसाठी अनुकूल बनवतात.  

टॅफेचे सी.ई.ओ. संदीप सिन्हा म्‍हणाले, ”आम्हाला जागतिक दर्जाची स्टाइलिंग आणि अंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली G3 सीरीज़ लाँच करताना खूप आनंद होत आहे. जी स्टाइलिंग, उत्तम फिट आणि मजबूत निर्माण क्वॉलिटीमध्ये उच्च दर्जाची ऑटोमोटिव्ह स्तराची उत्कृष्टता प्रदान करते. आयशर प्राइमा G3, आयशरच्या मुख्य मानक टिकाऊपणा आणि  विश्वसनीयतेचे प्रतिबिंब आहेत. प्राइमा G3 मध्ये आरामदायक, सुरक्षित आणि दीर्घ कालावधीसाठी उत्पादक वापरासाठी श्रमदक्ष ऑपरेटर स्टेशन आणि नवीन स्टीयरिंग नियंत्रण उपलब्ध आहे. नवीन आयशर प्राइमा G3 सीरीज़ आमच्या ग्राहकांना सहज उपलब्ध होईल याची आम्ही खात्री करू.”

नवीन आयशर प्राइमा G3 चालकाच्या सगळ्या मापदंडांना पुन: परिभाषित करते. सुविधाजनक डिझाइन केलेली उच्च सीटिंग कॉम्फी-लक्स सीट ट्रॅक्‍टर चालवताना सभोवतालचे स्पष्ट दृश्य प्रदान करते आणि तसेच दीर्घकाळ ट्रॅक्टर चालविण्यास मदत होते. शिवाय त्याचे मोठे आणि आरामदायी प्लॅटफॉर्म आपल्या श्रेणीमध्ये सर्वोत्तम परिचालन सुविधेचे उदाहरण आहे. आयशर प्राइमा G3 ला अत्यधिक सुरक्षितता लक्षात घेऊन डिझाइन केले आहे, दिवस असो वा रात्र यामधील अद्वितीय ‘लीड मी होम’ फीचर सुरक्षा आणि सुविधा हे दोन्ही सुनिश्चित करते.

भारतीय ट्रॅक्‍टर उद्योगामध्ये अग्रणी – आयशर ट्रॅक्‍टर्सने अनेक पिढ्या भारतीय कृषी समुदायाला साह्य करण्‍यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावली आहे. ६० वर्षांहून अधिक काळाच्‍या वारसासह त्‍यांनी हरित क्रांतीमध्‍ये महत्त्वात्वाची भूमिका बजावली आहे, तसेच अद्वितीय विश्वास संपादित केला, या लाँचसोबत आयशर ट्रॅक्टर्सने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना “उम्मीद से ज्यादा”  या  वचनाचे  पालन  केले आहे.  

agri news

To know more about tractor price contact to our executive

Leave a Reply