पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये १९९१ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
KhetiGaadi always provides right tractor information
पश्चिम महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला दिवसभर शाश्वत वीज पुरवण्यासाठी आता सौर उर्जेचा उपयोग करून घेतला जाणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारच्या एक महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना २.० असे या योजनेचे नाव आहे. या अंतर्गत राज्यातील काही भागांत १०९१ मेगावॅट क्षमतेच्या कृषी सौर ऊर्जा प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विविध ठिकाणी कृषी सौर ऊर्जा केंद्र स्थापन करण्याचे व्यापक प्रयत्न देखील सुरू झाले आहेत. या योजनेअंतर्गत, पश्चिम महाराष्ट्रातील शेतीला दिवसा आणि शाश्वत वीज पुरवण्यासाठी १९९१ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील २७६ उपकेंद्रांसाठी एकूण १९९१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात २७६ उपकेंद्रे
५९१५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० ची जलदगतीने अंमलबजावणी होत असून, पश्चिम महाराष्ट्रातील शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन ७१० उपकेंद्रांद्वारे केले आहे. यासाठी, ५९१५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे आणि आतापर्यंत ७६६९ एकर सरकारी जमिनी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात, २७६ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीज पुरवण्यासाठी १९९१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याचे काम सुरू झाले आहे. या २७६ उपकेंद्रांच्या क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना दिवसा आणि शाश्वत वीज पुरवठा केला जाईल.
शेतकऱ्यांची मागणी पूर्ण
अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा मिळवण्याची मागणी केली होती जी आता पूर्ण होत आहे. त्यामुळे महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी संबंधित ग्रामपंचायती आणि नागरिकांना सौर ऊर्जा प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील सौर ऊर्जा निर्मितीमध्ये पुणे जिल्ह्यातील ५४ उपकेंद्रांसाठी ४२९ मेगावॅट, सातारा जिल्ह्यातील ३९ उपकेंद्रांसाठी २०८ मेगावॅट, सांगली जिल्ह्यातील ४१ उपकेंद्रांसाठी ३१७ मेगावॅट, कोल्हापूर जिल्ह्यातील ४४ उपकेंद्रांसाठी १७० मेगावॅट आणि सोलापूर जिल्ह्यातील ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॅट एकूण १९९१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प संबंधित यंत्रणांकडून स्थापन केले जात आहेत.
कृषी क्षेत्राला काय लाभ मिळणार?
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीची पूर्तता होऊ लागली आहे. तसेच, ज्यांच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प राबवले जातील त्या प्रत्येक ग्रामपंचायतींना तीन वर्षांसाठी प्रति वर्ष १५ लाख रुपयांची अनुदान दिली जाईल. विशेष म्हणजे, सौर ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम, त्याचे २५ वर्षांचे संचालन, आणि देखभाल-डागडुजी यामुळे राज्यातील ग्रामीण भागात सुमारे ६,००० पूर्णवेळ आणि १३,००० अंशवेळ नोकऱ्यांची निर्मिती होईल. तसेच, ज्यांच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन केले जातील त्या ग्रामपंचायतींना २०० कोटींहून अधिक अनुदान मिळेल आणि राज्यातील सार्वजनिक सुविधा पुरवण्यासाठी योगदान दिले जाईल.
समस्यांचे निराकरण होणार
राज्यात अत्याधुनिक तसेच शाश्वत विद्युत तंत्रज्ञानावर अधिक काम केले जाण्याची आवश्यकता आहे. राज्यात एकूणच कृषी औद्योगिक तसेच अन्य सर्व क्षेत्रातून विजेची उच्च मागणी असल्याने विद्युत तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी क्षेत्रापुरता विचार करायचा तर अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पंप आणि उपकरणे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. सौर ऊर्जा तंत्रज्ञान ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठीचा एक उत्तम पर्याय असू शकतो आणि विद्युत तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण देखील यामुळे होऊ शकणार आहे.
देशातील कष्टकरी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा विविध पीक पद्धती, उत्पन्न वाढ योजनांची माहिती मिळवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना आणि इतर सरकारी योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी आमच्या whatsapp चॅनेलच्या माध्यमतून आमच्याशी सतत संपर्कात रहा. कृषीविषयक अधिक तपशीलवार माहितीसाठी, नियमितपणे https://khetigaadi.com/ ला भेट द्या!
To know more about tractor price contact to our executive