पुण्यात होणार मिलेट(Millet) महोत्सव!
शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा आणि ग्राहकांना रास्त दरात उत्तम गुणवत्तेचा शेतमाल उपलब्ध व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ दरवर्षी विविध फळ व धान्य महोत्सवांचे आयोजन करते. याच धर्तीवर यंदा पुण्यात भरडधान्यांसाठी (मिलेट Millet) महोत्सव आयोजित केला जाणार आहे. पुणेकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिलेटपासून तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
KhetiGaadi always provides right tractor information
उत्पादक ते थेट ग्राहक विक्रीची संकल्पना
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाद्वारे मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवून देणे, तसेच ग्राहकांना उच्च गुणवत्तेचे उत्पादन रास्त दरात उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
‘तृणधान्य वर्षा’ची प्रेरणा
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले होते. या उपक्रमामुळे तृणधान्यांच्या पोषणमूल्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली, आणि ग्राहकांचा कल या आरोग्यदायी अन्नधान्यांकडे वाढला. २०२३ मध्ये पुण्यातील मिलेट (Millet) महोत्सवाला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता, या वर्षीही या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महोत्सवाची ठिकाणे व दिनांक
महोत्सवाचे आयोजन ८ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत स्वारगेटजवळील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. ९ जानेवारीला मंत्री जयकुमार रावल स्वतः महोत्सवास भेट देऊन शेतकरी उत्पादक व स्टार्टअप्सशी संवाद साधतील.
महोत्सवाचे वैशिष्ट्ये
या महोत्सवात राज्याच्या विविध भागातील शेतकरी उत्पादक, सहकारी संस्था, बचत गट, आणि स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. येथे सुमारे ५० स्टॉल्सद्वारे ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा यांसारखी भरडधान्ये तसेच यापासून बनवलेली उत्पादने जसे की ज्वारी रवा, बाजरीच्या लाह्या, रागी बिस्किटे, ज्वारी इडली-मिक्स, रागी डोसा-मिक्स, आणि ज्वारी आईसक्रीम थेट विक्रीसाठी उपलब्ध असतील.
याशिवाय, नागपूर विभागाच्या विनंतीनुसार काही संत्रा उत्पादकही महोत्सवात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रम व उपक्रम
- नामांकित तज्ज्ञांकडून आरोग्यदायी अन्नधान्यांबाबत मार्गदर्शन.
- मिलेट(Millet) उत्पादनांवरील प्रात्यक्षिके.
- खरेदीदार व विक्रेत्यांचे संमेलन.
आरोग्यदायी नववर्षाची सुरुवात
पुणेकरांनी या महोत्सवात सहभागी होऊन मिलेट (Millet)उत्पादने खरेदी करावीत, आरोग्यविषयक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीसह नववर्षाची सुरुवात करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
खेतीगाडीच्या व्हॉट्सॲप चॅनेलशी कनेक्ट रहा आणि शेतीतील नवनवीन शोध आणि सरकारी योजनांची नवीनतम माहिती मिळवा. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी खेतीगाडी ला भेट द्या.
शेतकऱ्यांसाठीच्या कृषी योजनांच्या मार्गदर्शनासाठी आणि अपडेट्ससाठी खाटेगडी येथे संपर्क साधा:
फोन: 07875114466
ईमेल: connect@khetigaadi.com
To know more about tractor price contact to our executive
I likie thhe heslpful infto you provide in yoour articles.
I’ll bookmzrk yourr weblog andd check agwin ere regularly.
I’m quie cerrtain I willl learn many new sttuff right here!
Best oof luck for the next!