वाढलेले पेरणी क्षेत्र, ऊस लागवडीमुळे खताच्या मागणीत वाढ
खरीप हंगामासाठी तीन हजार ६२१ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला करण्यास महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यातर्फे मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने दोन हजार ८०० टन युरियाचा साठा खुला केला आहे. तर उर्वरित साठाही लवकरच खुला करण्यात येणार आहे.
KhetiGaadi always provides right tractor information
राज्यात सर्वदूर यंदा सुरवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने सोलापूरमध्ये सरासरीच्या १२ टक्के खरीप पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्याची खरीप पेरणीची सरासरी चार लाख २१ हजार १९८ हेक्टर असून यंदा सर्वाधिक पाच लाख १२ हजार ८९८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सतत होत असलेल्या पावसामुळे उसाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. एक ऑगस्टपर्यत जिल्ह्यात १२ हजार ६२१ हेक्टरवर नवीन ऊस लागवड झाली आहे.
युरिया टंचाईची समस्या
वाढलेले पेरणी क्षेत्र, पेरणीनंतरही चांगला पाऊस आणि ऊस लागवडीमुळे जिल्ह्यात युरियाची टंचाई जाणवत होती. जिल्ह्यातील अनेक निविष्ठा विक्रेत्यांकडे खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यासाठी संरक्षित युरियाचा साठा खुला करण्याची शेतकरी व विक्रेत्यांची मागणी होती. त्यावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे संरक्षित खतसाठा खुला करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला होता.
खरीप हंगाम हा ३० ऑगस्टपर्यत असतो. त्यासाठी जिल्ह्याकरिता नऊ हजार ६२० मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा आहे. त्यातील तीन हजार ६८८ मेट्रिक टन युरिया खुला करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंळाने २८०० मेट्रिक टन युरिया खुला केला आहे. उर्वरित साठाही लवकरच खुला करण्यात येणार आहे.
वाढीव हमाली मान्य
दरम्यान, कुर्डूवाडी मालधक्क्यावर खत हमाली वाढवून देण्याच्या माथाडी कामगार संघटनेच्या मागणीमुळे कुर्डुवाडीतील मालधक्का गेल्या महिनाभरापासून बंद होता. महाराष्ट्रात सर्वाधिक ३०० रुपयांचा हमाली दर असतानाही या ठिकाणच्या कामगारांची त्यात ७० रुपये वाढ करण्याची मागणी होती. त्यामुळे ते परवडत नसल्याने विविध खत कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याचे सुमारे ५० हजार मेट्रिक टन खत अन्य जिल्ह्याकडे वळविले होते. त्यामुळेही जिल्ह्यात खतांची टंचाई जाणवत होती. कामगारांनी ३०० रुपये हमाली मान्य केल्याने कंपन्यांनी या धक्क्यावर खत आणण्यास सुरवात केल्याने जिल्ह्याला वेळेवर खत पुरवठा होण्यास आणि टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
एकूण तीन हजार ६० मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार दोन हजार ८०० मेट्रिक टन साठा खुला केला आहे. उर्वरित साठाही खुला केला जाईल. सोलापूर, पंढरपूर मालधक्क्यावरुन खत वाहतूक सुरू आहे. कुर्डुवाडीतील हमालीचा विषय मिटल्याने तेथूनही खत वाहतूक सुरू झाल्याने जिल्ह्यातील खत पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असे सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांची चिंता दूर होणार
खरीप हंगामासाठी युरियाची मागणी वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी विभागाने त्वरीत कार्यवाही करत संरक्षित युरियाचा साठा खुला करण्याची प्रक्रिया गतिमान केली. कुर्डुवाडी मालधक्क्यावरून पुन्हा खतांची वाहतूक सुरू झाल्याने जिल्ह्यातील खत पुरवठा सुरळीत झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून, खतांच्या वेळेवर उपलब्धतेमुळे खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पिकांची योग्य वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी विनाकारण काळजी न करता आपल्या नजीकच्या वितरण केंद्रातून युरिया खरेदी करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. खतांच्या साठ्याच्या परिस्थितीवर कृषी विभागाचे सतत लक्ष असून, उर्वरित युरियाचा साठा देखील लवकरच खुला केला जाईल, असेही कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
देशातील कष्टकरी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा विविध पीक पद्धती, उत्पन्न वाढ योजनांची माहिती मिळवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना आणि इतर सरकारी योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी आमच्या whatsapp चॅनेलच्या माध्यमतून आमच्याशी सतत संपर्कात रहा.
कृषीविषयक अधिक तपशीलवार माहितीसाठी, नियमितपणे https://khetigaadi.com/ ला भेट द्या!
To know more about tractor price contact to our executive