शेतीविषयी आधुनिक माहिती देणारी खेतीगाडी

खेतीगाडी हे ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी, विक्री आणि ती भाडेतत्वावर मिळवण्यासाठीचा पहिला व एकमेव जागतिक ऑनलाईन मंच असून, खेतीगाडी ची सेवा सोलापूरमधे प्रारंभ झाल्याची घोषणा आज करण्यात आली. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचे तंत्रज्ञान पुरवून शिक्षित करणे तसेच, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आर्थिक बचत करण्यासाठी सक्षम करणे, हे ‘‘खेतीगाडी.कॉम’’ चे प्रमुख उद्दिष्ट आहे. शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधित समुदायाला पेलावी लागणारी आव्हाने समजून घेऊन ‘’खेतीगाडी’’तर्फे त्यांना सोपे, सोयीस्कर, सुकर आणि एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे पर्याय पुरवले जातात व ते शेतकरी, उत्पादक, वितरक, कंत्राटदार अशा सर्वांच्या दृष्टीने परस्परांच्या उपयोगाचे ठरतात. ‘’खेतीगाडी’’ मंचावर सर्व ब्रॅन्डचे, सर्व प्रकारचे, सर्व शक्तीचे आणि सर्व क्षमतेचे ट्रॅक्टर्स तसेच, शेतीविषयक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.

Leave a Reply