शेतकऱ्यांची पोरं लय हुशार ! बळीराजाच्या समस्यांवर शोधला ‘खेतीगाडी’चा उपाय

आधुनिक ज्ञानापासून दूर असलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना सहकार्य करणे आणि शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवणे, हे दोन उद्देश डोळ्यापुढे ठेऊन दोन उच्चशिक्षित शेतकऱयाच्या पोरांनी अफलातून स्टार्टअप सुरू केले आहे. शेतकरी कुटुंबामधून आले असल्यामुळे हे दोघेही शेतकऱयांच्या समस्यांशी चांगलेच परिचीत होते. यातुनच त्यांनी खेतीगाडी नावाचे अॅप बनवले आहे. ट्रॅक्टर भाड्याने घेणे असो, वा इतर यांत्रिक सामुग्री, किंवा शेतमजुरांचा प्रश्न असो, या अॅपद्वारे शेतकऱयांना या सुविधा वापरता येणार आहेत. तसेच शेतीसंबधी सहकार्य आणि आत्याधुनिक माहितीही या अॅपद्वारे मिळणार आहे.

Leave a Reply