जॉन डीयर पॉवर अँड टेक्‍नॉलॉजी शो आणि भारतात ५एम सिरीज – ५१३०एम (१३० एचपी)चे अनावरण

जॉन डीयर पॉवर अँड टेक्‍नॉलॉजी शो आणि भारतात ५एम सिरीज – ५१३०एम (१३० एचपी)चे अनावरण

99

डीयर अँड कंपनी कृषी, बांधकाम व वनीकरण क्षेत्रांमधील जागतिक तंत्रज्ञान अग्रणी आहे, जी त्‍यांचे ग्राहक, चॅनेल भागीदार, पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांच्‍या यशाप्रती कटिबद्ध आहे. जॉन डीयर तंत्रज्ञान कंपनी म्‍हणून आपली भूमिका अधिक दृढ करत आहे, तसेच जगभरातील विविध भौगोलिक भागांमधील वर उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या क्षेत्रांमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यामध्‍ये मोठे योगदान दिले आहे.

KhetiGaadi always provides right tractor information

जॉन डीयरने भारतात गेल्‍या २७ वर्षांहून अधिक काळापासून शेतकरी समुदायांच्‍या कल्‍याणासाठी तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत उपाययोजनांचे नेतृत्‍व केले आहे. यामध्‍ये कृषी उत्‍पादकता सुधारण्‍याचा, जमिनीच्‍या आरोग्‍याचे संरक्षण करण्‍याचा, जल संवर्धनाचा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्‍याचा मनसुबा आहे, जे शाश्वत कृषीचे महत्त्वपूर्ण आधारस्‍तंभ आहेत. 

राजेश सिन्‍हा, जॉन डीयर इंडियाचे एमडी व कंट्री मॅनेजर आणि सीॲण्डएफ वर्ल्‍डवाइडच्‍या अध्‍यक्षांचे धोरणात्‍मक सल्‍लागार म्‍हणाले, ”जॉन डीयरच्‍या धोरणामधील प्रमुख बाब म्‍हणजे स्‍मार्ट कनेक्‍टेड मशिन्‍ससाठी अचूक कृषी व डिजिटल उपाययोजनांचे एकीकरण, ज्‍यामुळे शेतकरी कमी संसाधनांमध्‍ये देखील अधिकाधिक उत्‍पादन करण्‍यास सक्षम होतात. नुकतेच लाँच करण्‍यात आलेले तंत्रज्ञान शेतीमधील कामे व उत्‍पादन खर्च कमी करण्‍यासाठी, जमिन व पर्यावरण स्थिरतेची खात्री घेणाऱ्या अचूक पीक संरक्षण उपाययोजना तयार करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.” संशोधन व विकास, अभियांत्रिकी, जागतिक आयटी, पुरवठा यंत्रणा, रस्ते बांधकाम, उत्पादन आणि कौशल्य या क्षेत्रांतील जॉन डीयरची भारतातील उपस्थिती जगभरातील कार्यसंचालनांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे सिन्‍हा पुढे म्‍हणाले.

Khetigaadi

रमाकांत गर्ग, भारतातील सेल्‍स अँड मार्केटिंगचे डायरेक्‍टर म्‍हणाले, ”प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि विकसित होत असलेल्‍या कृषी पद्धती एकमेकांशी पूरक आहेत. जॉन डीयर भावी कृषी पद्धतींसाठी यामध्‍ये संतुलन राखण्‍याप्रती कटिबद्ध आहे. पॉवर अँड टेक्‍नॉलॉजी ७.० हे त्‍याच दिशेने पाऊल आहे, ज्‍यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:   

  • ५१३०एम (१३० एचपी) ट्रॅक्‍टरवर फ्रण्‍ट हिच व फ्रण्‍ट पीटीओ अॅप्‍लीकेशन
  • ५ई ऑटोट्रॅक™ (स्‍ट्रेट-रो वेईकल गाइडन्‍स सिस्‍टम)
  • ग्रीनसिस्‍टम™ लिंक – फॅक्‍टरी-फिटेड किट – कनेक्‍टीव्हीटी सोल्‍यूशन
  • ५४०५ आणि ५०७५ई रेडियल टायर्स (१००%)

गतकाळापासून जॉन डीयर भारतातील बाजारपेठांसाठी तंत्रज्ञानदृष्‍ट्या उच्‍च दर्जाची उत्‍पादने सादर करण्‍यामध्‍ये आघाडीवर आहे आणि आम्‍हाला आजच्‍या तंत्रज्ञान इव्‍हेण्‍टमध्‍ये ही परंपरा कायम राखताना अभिमान वाटतो, असे रमाकांत पुढे म्‍हणाले.

भारतातील वैविध्यपूर्ण कृषी परिस्थितीशी सुसंगत अशा स्थानिक बदलांनुसार नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या जॉन डीयरच्या दृष्टिकोनामुळे, तसेच सरकारच्या मोहिमेला पाठिंबा देण्याच्या भूमिकेमुळे कंपनीला भारतात मोठे यश मिळाले आहे. तसेच, याच यशामुळे कंपनी जगातील ११० देशांमध्ये उत्पादनांची निर्यात करत आहे.

श्री. मुकुल वार्ष्‍णेय, रिजन १ गव्‍हर्नमेंट अफेअर्स डायरेक्‍टर म्‍हणाले, ”’सरकारचे २०४७ पर्यंत शाश्वतता ध्‍येय संपादित करण्‍यासाठी जॉन डीयरकडून सर्वोत्तम पाठिंबा मिळू शकतो, ज्‍यामुळे उत्‍पादने व सेवांपलीकडे आमची जबाबदारी व उत्तरदायीत्‍व अधिक वाढले आहे. सध्‍या अत्‍यंत लाभदायी परिसंस्‍था पाहायला मिळत आहे, जी आम्‍हाला शैक्षणिक संस्‍था, संशोधन संस्‍था व उद्योग अशा भागधारकांसोबत सहयोग करण्‍याच्‍या आमच्‍या प्रयत्नांना अधिक वाढवण्‍यास मदत करत आहे. जॉन डीयरमध्‍ये आमचा ठाम विश्वास आहे की, यामुळे आपल्‍या देशातील शेतकरी आगामी काळात जागतिक स्‍तरावर सक्षम व स्‍पर्धात्‍मक होण्‍यास मदत होईल.”  

About Deere & Company

It doesn’t matter if you’ve never driven a tractor, mowed a lawn, or operated a dozer. With John Deere’s role in helping produce food, fiber, fuel, and infrastructure, we work for every single person on the planet. It all started nearly 200 years ago with a steel plow. Today, John Deere drives innovation in agriculture, construction, forestry, turf, power systems, and more. For more information on Deere & Company, visit us at www.deere.com/en/news/.

Stay connected to the KhetiGaadi WhatsApp channel and get the latest updates on farming innovations and government schemes. Visit KhetiGaadi for more information and guidance. 

agri news

To know more about tractor price contact to our executive

Leave a Reply