टॅफ़े ने 2,14,000 पेक्षा अधिक ट्रॅक्टर्सची विक्री केली, आर्थिक वर्ष 26(FY26) मध्ये हा विकास आर्थिक वर्ष 26(FY26) चा स्थानिक विकासापेक्षा जलदगतीने करण्यात आला

टॅफ़े ने 2,14,000 पेक्षा अधिक ट्रॅक्टर्सची विक्री केली, आर्थिक वर्ष 26(FY26) मध्ये हा विकास आर्थिक वर्ष 26(FY26) चा स्थानिक विकासापेक्षा जलदगतीने करण्यात आला

38

मुंबई : ट्रॅक्टर्स ॲन्ड फ़ार्म इक्विप्मेंट (TAFE),जगातील अग्रगण्य ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असून भारतातील दुसरी सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे, कंपनीद्वारे आपला आर्थिक वर्ष 26(FY26) करीताचा प्रगती अहवाल जाहिर करण्यात आला, ज्यानुसार कंपनीचा इतिहासातील सर्वात अधिक विक्रीचा टप्पा कंपनीने गाठला असून साधारण 2,14,951 युनिट्सची विक्रमी विक्री झाली आहे.

टॅफ़ेने आपल्या आर्थिक वर्षाचे समापन भक्कम पद्धतीने केले आहे, मार्च 2026 मध्ये विकासाचा दर हा 37.4% एवढा होता हा विकास या महिन्यात झालेल्या 29%  स्थानिक विकासा पेक्षा देखील जास्त होता. औद्योगिक विकासाचा तुलनेत जलदगतीने विकास होणे टॅफ़ेचा मजबूत उत्पादन श्रेणी, शेतकऱ्यांशी असलेले भक्कम नाते आणि शेतीय विभागांमध्ये सातत्याने होणारी मागणी दर्शविते.

कंपनीद्वारे स्थानिक विक्री ही आत्ता पर्यंतची सर्वाधिक विक्री होती, कंपनीचे दोन्ही ब्रॅन्ड्स मॅसे फ़र्ग्युसन आणि आयशर ट्रॅक्टर्स यांनी विक्रमी विक्री ची नोंद केली. टॅफ़ेची निर्यात ही देखील चांगली झाली, आंतरराष्ट्रीय बाजार पेठेमध्ये 12,584 ट्रॅक्टर ची विक्री झाली ज्यामुळे कंपनीचे  जागतिक अस्तित्व आणि वैविध्यपूर्ण विकासाचे धोरण अधोरेखीत होते.

Khetigaadi

स्थानिक बाजारपेठेची आणि निर्यातीची मागणी पूर्ण करण्याकरीता, वर्षभरात टॅफ़ेचे उत्पादन प्लान्ट संपूर्णपणे कार्यरत होते. कंपनीद्वारे क्षमता वाढविण्याकरीता मूल्यांकन केले जात असून, भविष्यातील वाढती मागणी आणि जागतिक ट्रॅक्टर उद्योगामध्ये आपले नेतृत्व राखण्याकरीता योग्य ती पाऊले कंपनीद्वारे उचलली जातील.

या प्रगतीवरती बोलताना, टॅफ़ेचे , वाईस चेअरमन, डॉ. लक्ष्मी वेणू म्हणाली, “ हे वर्ष, ट्रॅक्टर उद्योग तसेच देशातील शतकऱ्यांकरीता अतीशय सकारात्म होते. त्याच बरोबर हवामान चांगले असणे, सरकार द्वारे जीएसटी कमी केल्याने देखील शेतीय क्षेत्राला दिलासा मिळालेला आहे.

सध्या एक चांगला ट्रेन्ड बघायला मिळतो आहे, ज्यामुळे तंत्रज्ञान हे ग्रामीण भागात झपाट्याने रूजताना दिसते आहे. यावर्षी एक चांगला बदल झालेला आढळून आला ज्यानुसार लहान शेतकऱ्यांना तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने पहिल्यांदा यंत्रणेचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा संख्ये मध्ये वाढ दिसून आली. यामुळे शेतीय उत्पादकता तर वाढलीच पण देशभरातील शेतकऱ्यांचा मिळकतीला सुद्धा बळ मिळाले. टॅफ़ेमध्ये आमचे ध्येय हे आमचा या क्षेत्रातल्या ग्राहकांना आधुनिक पर्याय लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आहे आणि या ध्येयामुळेच आम्हाला यावर्षी बाजारात उत्तम कामगिरी करता आली आहे. “

सध्याचा भू-राजकारण आणि युद्धा मुळे पुरवठा साखळीवर आलेल्या अस्थिरतेमुळे जागतिक  अनिश्चितता आणि महागईचा ताण वाढतो आहे आणि या सगळ्याचा परिणाम हा इन्पुट कॉस्टवर होत असताना, भारतीय शेती क्षेत्र हे मुलभूत पद्धतीने लवचिक राहिले आहे.

पुढचा विचार केला तर, यांत्रिकीकरणाचा सतत स्वीकार, बदलाची मागणी, ट्रॅक्टर्स आणि साधनांचा विस्तार आणि निर्यात बाजारपेठांमधून हळूवार होणाऱ्या सुधारांचा आधारावर टॅफ़े मध्यम-मुदतीचा दृष्टीकोनाबद्दल आशावादी आहे. आपल्या विकासाची गती कायम ठेवण्याचा विश्वास टॅफ़ेला आहे.

TAFE – ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड, ही १९६० मध्ये चेन्नई, भारत येथे स्थापन झालेली एक प्रमुख भारतीय ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक आणि उत्पादनाच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी म्हणून, TAFE वार्षिक 200,000 पेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची विक्री करते. उच्च गुणवत्ता आणि कमी परिचालन खर्च यासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या उत्पादनांच्या श्रेणीद्वारे TAFE ने जगभरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. १,६०० हून अधिक डीलर्सचे मजबूत वितरण जाळे TAFE च्या चार आयकॉनिक ट्रॅक्टर ब्रँड्सना – मॅसी फर्ग्युसन इंडिया, टॅफे ट्रॅक्टर्स, आयशर ट्रॅक्टर्स आणि आयएमटी (IMT) – प्रभावीपणे पाठबळ देते. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि रशिया अशा ८० हून अधिक देशांमध्ये TAFE आपले ट्रॅक्टर्स निर्यात करते, ज्यामुळे तेथील शेती क्षेत्राला मोठी मदत होत आहे.

टॅफ़े बद्दल थोडक्यात: tafe.com

२००५ मध्ये, TAFE ने आपल्या ‘टॅफे मोटर्स अँड ट्रॅक्टर्स लिमिटेड’ (TMTL) या पूर्ण मालकीच्या उपकंपनीद्वारे, जर्मन वारसा असलेल्या सुप्रसिद्ध ‘आयशर’ (Eicher) ब्रँडचा ट्रॅक्टर, इंजिन आणि ट्रान्समिशन व्यवसाय आत्मसात केला. ट्रॅक्टर्सव्यतिरिक्त, TAFE आणि त्यांच्या उपकंपन्यांचे शेतीची यंत्रसामग्री, डिझेल इंजिन आणि जनरेटर, इंजिनिअरिंग प्लास्टिक, गिअर्स आणि ट्रान्समिशन घटक, हायड्रॉलिक पंप आणि सिलिंडर, वाहन फ्रँचायझी आणि मळे (plantations) यांसारख्या विविध क्षेत्रांत व्यावसायिक हितसंबंध आहेत.

टॅफ़ेने प्रसिद्ध असलेल्या सर्बियन ट्रॅक्टर ॲन्ड ॲग्रीकल्चरल इक्विप्मेंट ब्रॅन्ड आयएमटी-  ची देखील मालकी २०१८ मधे मिळविली. याशिवाय टॅफ़ेने भारतीय इंटिरियर उद्योगातील फ़ोरविया समूहाचा फ़्यूरेशिया – फ़्रेन्च ग्लोबल ऑटोमोटिव सप्लायरची देखील २०२२ मध्ये मालकी मिळविली.

टॅफ़ेने आपल्या उत्पादनांचा श्रेणींमुळे ग्राहकांचा विश्वास संपन्न केला आहे, ही उत्पादने उत्तम गुणवत्ता आणि काम करण्यात कमी खर्चाची मानली जातात. पारंपारिक कला जोपाण्यासह टॅफ़ेचे सामाजिक ध्येय हे शेतीय, शिक्षण, आरोग्य सेवा, सामाजिक विकास, आपत्कालीन मदत, संवर्धन आणि वनवासी विकासचे राहिले आहे



Stay connected to the KhetiGaadi WhatsApp channel and get the latest updates on farming innovations and government schemes. Visit KhetiGaadi for more information and guidance. 

agri news

To know more about tractor price contact to our executive

Leave a Reply