पेरण्या चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर पिकाचे संरक्षण करण्यासाठी फवारणी पंपांना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी मिळत असते. अनेकदा पंप उपलब्ध नसल्यास त्याचा पिकावर आणि पर्यायाने एकूण उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने १०० टक्के अनुदान वर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
KhetiGaadi always provides right tractor information
मुदत वाढवली
कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबीयाआधारित पिकांना चालना देण्यसाठी राज्यसरकार कडून एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजना सुरु आहे. यासाठी सरकारने शेतकऱ्यांना चालु वर्षासाठी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी शासनाने याआधी २४ जुलै ही अंतिम तारीख जाहीर केली होती, परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत शासनाने वाढवून दिली आहे.
देशाच्या अन्य भागांप्रमाणेच महाराष्ट्र राज्यात सर्वदूर सध्या चांगला पाऊस होत असल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या उरकून घेतल्या आहेत. कापूस, सोयाबीन क्षेत्रांवर पेरण्या झाल्या असून पिके बहरात आहेत. पिकांवर फवारण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. याला सहाय्य म्हणून शासनाच्या कृषी विभागाने देखील पाऊल उचलले आहे. त्या अंतर्गत बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या अनुदानासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२४ निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
कुठे कराल अर्ज?
शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
१०० टक्के अनुदानावर फवारणी पंप
शेतकरी बांधवांना १००% अनुदांनावरती नॅनो युरिया, डीएपी, बॅटरी संचलित फवारणी पंप वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू होते. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही ३० जून पर्यंत होती. त्यानंतर दिनांक २४ जुलै रोजी नॅनो युरिया, डीएपी, घटकाची सोडत यादी काढण्यात आली होती. परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप साठी अद्याप सोडत यादी काढण्यात आली नाही. तर, फक्त बॅटरी संचलित फवारणी पंप साठी आता कृषी विभागाकडून शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.
अर्जांची संख्या कमी असल्याने देण्यात आली मुदतवाढ
सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये खालील निविष्ठा १००% अनुदान पुरविण्यात येणार आहेत. मागील १० दिवसापासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू असुन सद्यस्थितीत अर्जांची संख्या खूप कमी प्रमाणात असल्यामुळे दि. १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यास वाढीव मुदत देण्यात येत आहे.
कसा कराल अर्ज?
- शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटला भेट द्या.
- लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- ‘अर्ज करा’ असे लिहिलेल्या बटणावर क्लिक करा.
- कृषि यांत्रिकीकरण चे बटन निवडा आणि त्यावर क्लिक करा.
- मुख्य घटक बाबीवर क्लिक करून त्यानंतर कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य असे लिहिले असेल तिथे क्लिक करा.
- तपशिल असे लिहिले असेल तिथे क्लिक करून – मनुष्यचलीत औजारे घटक असे लिहिले असेल त्याची निवडा करा.
- यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करून – पिक संरक्षण अवजारे असे लिहिले असेल ते निवडा.
- मशीनचा प्रकार असे लिहिले असेल त्यावर क्लिक करून – बॅटरी संचलीत फवारणी पंप (गळीतधान्य)/कापूस याची निवड करा, आणि अर्ज सबमिट करा.
देशातील कष्टकरी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा विविध पीक पद्धती, उत्पन्न वाढ योजनांची माहिती मिळवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना आणि इतर सरकारी योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी आमच्या WhatsApp चॅनेलच्या माध्यमतून आमच्याशी सतत संपर्कात रहा.
कृषीविषयक अधिक तपशीलवार माहितीसाठी, नियमितपणे https://khetigaadi.com/ ला भेट द्या!
To know more about tractor price contact to our executive