Get Tractor Price
Published By : Nalanda Express Dec 14, 2018

खेतीगाडीचे सीईओ शिंदे यांनी दिली माहिती

सोलापूर : खेतीगाडी हे ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी - विक्री आणि ती भाडेतत्त्वावर मिळवण्यासाठीचा पहिला ऑनलाइन मंच आता सोलापुरात सेवा देणार आहे . शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे ज्ञान देऊन त्यांना शिक्षित करणे , तसेच त्यांची कार्यक्षमता वाढविणे , आर्थिक बचत करणे हे खेतीगाडी डॉट कॉम चे प्रमुख उद्दिष्ट आहे . खेतीगाडी मंचावर सर्व ब्रँडचे ,सर्व प्रकारचे , सर्व शक्तीचे आणि सर्व क्षमतेचे ट्रॅक्टर्स तसेच शेतीविषयक उपकरणे उपलब्ध असून या अँपचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान खेतीगाडीचे सीईओ प्रवीण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले . खेतीगाडी परिवारामध्ये ३०लाख शेतकऱ्यांचा झाला समावेश आहे. आधुनिक पद्धतीने शेती विकसित करावी . शेतकऱ्यांना केंद्रस्थानी धरूनच खेतीगाडीची संकल्पना विकसित करण्यात आली आहे . कारण शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा हा खेतीगाडीचा मूळ उद्देश आहे . खेतीगाडीचे संचालक विष्णू दास यांनी शेतीच्या यांत्रिकीकरण क्षेत्राचे आता डिजिटायझेशन होत असताना शेतीच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यावर खेतीगाडीने भर दिला आहे . खेतीगाडी अॅप १० प्रादेशिक भाषांमध्ये सुरु केले आहे . हे अॅप १८ भारतीय भाषांमध्ये आणि त्यानंतरच्या काळात विविध जागतिक भाषांमध्ये सुरु करण्याचा मानस आहे . खेतीगाडी तर्फे शेतकऱ्यांना कर्ज , वित्तीय सहाय्य आणि विमा यासारखे सहाय्यही पुरविले जाते . त्याकरिता त्यांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत . खेतीगाडी ने आतापर्यंत १० हजार वितरक साडेसहा हजार सेवा केंद्र , तीन हजार ब्रोकर आणि सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणले आहे . शेतीच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सखोल ज्ञानासह हा मंच सध्या राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादकांची उत्पादने पुरवत आहे . वापरलेल्या ट्रॅक्टर्सबरोबरच इतरही शेतीसाठीच्या उपकरणांची सेवा या मंचाद्वारे उपलब्ध करून दिली जात असल्याचे श्री . दास यांनी सांगितले .

Similar press releases

Quick Links

×
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience