Get Tractor Price
Published By : jan manthan Nov 14, 2018

खास शेतकऱ्यांसाठी असलेल्या “खेतीगाडीचे” उदघाटन

पुणे : ट्रॅक्टर आणि शेतीविषयक उपकरणांची खरेदी , विक्री तसेच ती भाड्याने देण्याची सुविधा असणारा जागतिक पहिला मंच . ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी , विक्री आणि ती भाड्याने मिळ्वण्यासाठीचा पहिला व एकमेव जागतिक मंच म्हणजे खेतीगाडी . त्याच्या देशातील सेवेचे उदघाटन पुण्यात करण्यात आले . 'खेतिगाडी . कॉम या नावाने असलेल्या या मंचाचा प्रमुख उद्देश आहे - शेतीच्या पद्धती अधिक कार्यक्षम करण्यासाठी योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना सक्षम बनवणे . शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधीत समाजां पेलावी लागणारी आव्हाने समजून घेऊन 'खेतिगाडी तर्फे ' त्यांना सोपे , सोयीस्कर , सुकर आणि एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे उपाय पुरवले जातात . ते शेतकरी , उत्पदक , वितरक , कंत्राटदार अशा सर्वांच्या दृष्टीने परस्परांच्या उपयोगाचे ठरतात . ' खेतीगाडी ' च्या मंचावर सर्व ब्रँडचे ,सर्व प्रकारचे , सर्व शक्तीचे आणि सर्व क्षमतेचे ट्रॅक्टर्स तसेच , शेतीविषयक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात . शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शेतीविषयक उपकाराने वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना शेतीच्या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करायला लावणे , हे खेतिगाडीचे प्रमुख प्रयोजन आहे . त्यासाठी 'खेतिगाडी ' तर्फे शेतकऱ्यांना विविध उत्पदनांची माहिती पुरवली जाते . त्यांना त्याचा उपयोग योग्य उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा त्यांची विक्री करण्यासाठी होतो . या साधनांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम कमी करणे शक्य होते . 'खेतीगाडी ' ला अशा साधनांचे सर्व प्रकारचे उत्पदक , खरेदीदार , विक्रेते , कंत्राटदार , अशी उतपादने भाड्याने देणारे अशा सर्व घटकांना एकमेकांच्या फायद्यासाठी एकाच मंचावर एकत्र आणण्यात यश आले आहे .

Similar press releases

Quick Links

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience