ट्रॅक्टर किंमत मिळवा
Published By : Divya Marathi Dec 14, 2018



खेतीगाडीचे  सीईओ  शिंदे यांनी दिली माहिती १० भाषांमध्येही अॅप उपलब्ध

३० लाख शेतकऱ्यांचा खेतीगाडी किसान परिवारमध्ये सहभाग

प्रतिनिधी सोलापूर : खेतीगाडी हे ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी - विक्री आणि ती भाडेतत्त्वावर मिळवण्यासाठीचा पहिला ऑनलाइन  मंच आता सोलापुरात सेवा देणार आहे . शेतकऱ्यांना योग्य प्रकारचे ज्ञान देऊन त्यांना शिक्षित  करणे , तसेच त्यांची कार्यक्षमता वाढविणे , आर्थिक बचत करणे हे खेतीगाडी डॉट कॉम चे प्रमुख उद्दिष्ट आहे . खेतीगाडी मंचावर सर्व ब्रँडचे ,सर्व प्रकारचे , सर्व शक्तीचे आणि सर्व क्षमतेचे ट्रॅक्टर्स तसेच शेतीविषयक उपकरणे उपलब्ध असून या अँपचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ   घ्यावा असे आव्हान खेतीगाडीचे सीईओ प्रवीण शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले .

परिवारमध्ये ३० लाख शेतकऱ्यांचा  समावेश झाला  आहे।  आधुनिक पध्दतीने शेती विकसित करावी ,शेतकऱ्यांना केंद्रस्थानी धरूनच खेतीगाडीची संकल्पना विकसित करण्यात आली आहे . कारण शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा हा खेतीगाडीचा मूळ उद्देश आहे . खेतीगाडीचे संचालक विष्णू दास यांनी शेतीच्या यांत्रिकीकरण क्षेत्राचे आता डिजिटायझेशन होत असताना शेतीच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यावर खेतीगाडीने भर दिला आहे .

खेतीगाडी अॅप १० प्रादेशिक भाषांमध्ये सुरु केले आहे . हे अॅप १८ भारतीय भाषांमध्ये आणि त्यानंतरच्या काळात विविध जागतिक भाषांमध्ये सुरु करण्याचा मानस आहे . खेतीगाडी तर्फे शेतकऱ्यांना कर्ज , वित्तीय सहाय्य आणि विमा यासारखे सहाय्यही  पुरविले जाते . त्याकरिता त्यांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत .

खेतीगाडी ने आतापर्यंत १० हजार वितरक साडेसहा हजार सेवा केंद्र , तीन हजार ब्रोकर आणि सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणले  आहे . शेतीच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सखोल ज्ञानासह हा मंच सध्या राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादकांची उत्पादने पुरवत आहे . वापरलेल्या ट्रॅक्टर्सबरोबरच इतरही शेतीसाठीच्या उपकरणांची सेवा या मंचाद्वारे उपलब्ध करून दिली जात असल्याचे श्री . दास यांनी सांगितले .

सारखा प्रेस विज्ञप्ति

द्रुत दुवे

x
KhetiGaadi Web App
KhetiGaadi Web App

0 MB Storage, 2x faster experience