शेतकरी समुदायासाठी 'खेतीगाडी' चे सोलापुरात आगमन
सोलापूर प्रतिनिधी : खेतीगाडी हे ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी ,विक्री व भाडेतत्त्वावर मिळवण्यासाठीचा पहिला व एकमेव जागतिक ऑनलाइन मंच असून खेतीगाडीची सेवा सोलापूरमध्ये प्रारंभ झाल्याची घोषणा आज करण्यात आली . शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचे तंत्रज्ञान पुरवून शिक्षित करणे, तसेच त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आर्थिक बचत करण्यासाठी सक्षम करणे हे खेतीगाडी डॉट कॉम चे प्रमुख उद्दिष्ट आहे . शेतकरी आणि त्यांच्या समुदायाला पेलावी लागणारी आव्हाने समजून घेऊन खेतीगाडी तर्फे त्यांना सोपे ,सोयीस्कर ,सुकर आणि एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे पर्याय पुरवले जातात व ते शेतकरी ,उत्पादक ,वितरक आणि कंत्राटदार अशा सर्वांच्या दृष्टीने परस्परांच्या उपयोगाचे ठरतात . खेतीगाडी मंचावर सर्व प्रकारचे . सर्व ब्रँडचे ,सर्व शक्तीचे आणि सर्व क्षमतेचे ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात . या सेवेच्या घोषणाप्रसंगी "प्रवीण शिंदे" फाऊंडर व सीईओ खेतीगाडी डॉट कॉम म्हणाले , कि खेतीगाडी परिवारामध्ये ३० लाख शेतकऱ्यांचा समावेश झाल्यामुळे आम्ही खूप आनंदित झालो आहोत तसेच आम्ही महाराष्ट्रातील आणि भारतातील शेतकऱ्यांना आव्हान करतो त्यांनी खेतीगाडी मंचाचा अधिक लाभ घेऊन आधुनिक पद्धतीने शेती विकसित करावी . शेतकऱ्यांना केंद्रस्थानी धरूनच खेतीगाडी ची संकल्पना विकसित करण्यात आली आहे . कारण शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा व्हावा हा खेतीगाडी चा मूळ उद्देश्य आहे . भारतात इंटर्नर चा प्रसार हा तळागाळापर्यंत झालेला आहे यामुळे खेतीगाडी अँप आणि संकेतस्थळ याना प्रचंढ प्रतिसाद मिळत आहे , असेही शिंदे यांनी सांगितले . तसेच यावेळी विष्णू दास डायरेक्टर व सीईओ खेतीगाडी डॉट कॉम म्हणाले , कि सर्वप्रथम मी या खेतीगाडी परिवारामध्ये जोडल्या गेलेल्या ३० लाख शेतकऱ्यांचे आभार मानतो . शेतीच्या यांत्रिकीकरण क्षेत्राचे जास्तीत जास्त प्रमाणात डिजिटायझेशन होत असताना शेतीच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यावर खेतीगाडी ने भर दिला आहे . इतकेच न्हवे तर भारतातील भौगोलिक विविधता ध्यानात घेता आम्ही खेतीगाडी अॅप १० प्रादेशिक भाषांमध्ये सुरु केले आहे . यापुढे हे अँप एकूण १८ भारतीय भाषांमध्ये आणि त्यानंतरच्या काळात विविध जागतिक भाषांमध्येही सुरु करण्याची आमची योजना आहे . जागतिक पातळीवर खेतीगाडी हि सेवा युरोप मधील जर्मनी या देशातून सुरु करण्यात येणार आहे .