जागतिक स्तरावरील खेतीगाडी ऑनलाइन मंचचे सोलापुरात पदार्पण : फाऊंडर प्रवीण शिंदे
आधुनिक पद्धतीच्या मदतीने शेती करण्याच्या पद्धतीत महत्वाचे म्हणून गणले जात असलेले ट्रॅक्टर - शेतीविषयक उपकरणाची खरेदी - विक्री व भाडेतत्त्वावर देण्याची सुविधा असणारा जागतिक स्तरावरील ऑनलाइन मंच खेतीगाडी ने सोलापुर शहरात पदार्पण केले आहे . खेतीगाडी परिवारमध्ये ३० लाख शेतकऱ्यांचा समावेश असून या अँपच्या माध्यमातून सोलापूर जिल्यातील शेतकऱ्यांची विनामूल्य सेवा करण्याचा संकल्प असल्याची माहिती खेतीगाडी डॉट कॉम चे फाऊंडर व सीईओ प्रवीण शिंदे" यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शेती विषयक उपकरणे वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना शेतीच्या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करावयास लावणे हे खेतीगाडी चे प्रमुख प्रयोजन आहे असे खेतीगाडी डॉट कॉम चे फाऊंडर व सीईओ प्रवीण शिंदे" यांनी स्पष्ट केले . ते पुढे म्हणाले , खेतीगाडी तर्फे शेतकऱ्यांना विविध उत्पादनांची सविस्तर माहिती पुरविणे , त्यांना त्याचा उपयोग योग्य उपकरणे खरेदी करणे अथवा विक्री करण्यासाठी होतो . या उपकरणाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम कमी करणे शक्य होते . खेतीगाडी ला शेतीविषयक उपकरणांचे सर्व प्रकारचे शेतकरी ,उत्पादक ,विक्रेते ,खरेदीदार , कंत्राटदार अशी उत्पादने भाड्याने देणारे अशा सर्व घटकांना एकमेकांच्या फायद्यासाठी एकाच मंचावर एकत्र आणण्यात यश आल्याचेही प्रवीण शिंदे यांनी सांगितले . ते पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले कि , ' खेतीगाडी डॉट कॉम' या मंचाची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली आहे . शेतीविषयक उपकरणांची खरेदी ,विक्री व ती भाडेतत्वावर देण्याची सोयीस्कर अशी ऑनलाइन सेवा पुरवणारा जगातील एकमेव मंच आहे . हा मंच म्हणजे शेतकरी ,उत्पादक ,विक्रेते ,खरेदीदार अशा सर्वांना एकमेकांशी जोडणारा तसेच त्यांच्या नेमक्या गरजा सोप्या आणि सहज पद्धतीने पूर्ण करणारा एकमेव मंच आहे . ट्रॅक्टर आणि त्याच्याशी संलग्न उपकरणे पुरविण्याबरोबर त्यासाठी लागणाऱ्या वित्तीय संस्थाची योग्य माहिती देणे,शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचे तंत्रज्ञान पुरवून शिक्षित करणे , त्यांची कृषीविषयक कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आर्थिक बचत करण्यासाठी खेतीगाडी डॉट कॉम चे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही शिंदे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले . शेतीच्या क्षेत्रातील तज्ञता आणि सखोल ज्ञानासह ' खेतीगाडी डॉट कॉम' हा मंच सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादकांची उत्पादने पुरवत आहे . खेतीगाडी अॅप इंग्रजी भाषेबरोबरच भारतातील १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे . ३०लाख शेतकऱ्यांचा खेतीगाडी परिवारामध्ये समावेश आहे . अगदी छोट्यात छोट्या आणि मोठ्या शेतकऱ्यांनी खेतीगाडी परिवारात सहभागी व्हावे असे आव्हान सीईओ प्रवीण शिंदे यांनी केले . 8)%)a))8)`8)%)/)(x)`8))8),8)cx)*)a8)-)a))8)%x),x)cx)+)/) )*8)/8)%x),8)cx)'8)-x)/))8)cx))8)`8)+8).8).x)/)+)cx)+8)!)()/8)-x)/)+)/8)+)/).8)/),8)%)a8).8).x)/)+)cx)+).x)`8)*)`x),8)-x),)a8)'8)/))8)a8))8)cx)+)/).8)/)(8)`8))8)cx)+)/) )*8)/8)-x)/)-x)/))8)*),8)cx)+)/)+8)"x)*),)+8)cx))8)%x),8)`)*8)))/),)a8)!).x)a))8)%)a))8)`8)%)/)(x)`8)*8)a8)!))8)/)*),8)cx)+) ))8)i)i8).x)'8)/),8)-x)/))8),8)%H8).8)/)(x)a).8).x)/8).x)'8)/),8).8)a)-x)/8)%x)a) )))cx),8))8)`8)*8).x)'8)/),8)+8)cx),8)b)%x),8)!)()/8).8)`x)+)/),8)a8)jx)i8),)/)%8)-)a))8)%x),x)cx)+)/) )*8)/8)#)%x))8)cx),8)!)(),)a8)!).x)a8)+)a))8)cx)+)/8)%x)/),)/))8)')cx),8)ax)%x)cx)'),8)+8),8)b)+8),8)&8)-)a))8)`8)&)cx)+)/8)!x)*8)cx)+8)"x)*)%x),8)()/) )&)`8).x)`8).8)a)-x)/8)%)a))8)`8)%)/)(x)`8)+)/8)+) )&)/)))cx)-x)/),8)a8)"x)*),)+8)cx))8)%x),8)`)*8)))/),)`8)'8)/)()/),8)!x).8),)cx)+)/)&)a).x)`8)-)a)-x)')`8)*)cx),8)-x)`8)(8)-)/) )))a8)+)/) )*8)`8).8)/) )%)/))8),)a