खेतीगाडी ऑनलाइन मंचचे सोलापुरात पदार्पण
आधुनिक पद्धतीच्या मदतीने शेती करण्याच्या पद्धतीत महत्वाचे म्हणून गणले जात असलेले ट्रॅक्टर - शेतीविषयक उपकरणाची खरेदी - विक्री व भाडेतत्त्वावर देण्याची सुविधा असणारा जागतिक स्तरावरील ऑनलाइन मंच खेतीगाडी ने सोलापुर शहरात पदार्पण केले आहे . खेतीगाडी परिवारमध्ये ३० लाख शेतकऱ्यांचा समावेश असून या अँपच्या माध्यमातून सोलापूर जिल्यातील शेतकऱ्यांची विनामूल्य सेवा करण्याचा संकल्प असल्याची माहिती खेतीगाडी डॉट कॉम चे फाऊंडर व सीईओ प्रवीण शिंदे" यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले ,खेतीगाडी डॉट कॉम म्हणजे शेतकरी ,उत्पादक ,विक्रेते ,खरेदीदार , कंत्राटदार अशा सर्वाना एकमेकांशी जोडणारा तसेच त्यांच्या नेमक्या गरज सोप्या आणि सहजता वाढविण्यासाठी आणि आर्थिक बचत करण्यासाठी खेतीगाडी डॉट कॉम चे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही शिंदे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले . खेतीगाडी अॅपइंग्रजी भाषेबरोबरच भारतातील १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे . ३०लाख शेतकऱ्यांचा खेतीगाडी परिवारामध्ये समावेश आहे . खेतीगाडी तर्फे शेतकऱ्यांना कर्ज , वित्तीय सहाय्य आणि विमा यासारखे सहाय्यहि पुरविले जाते . त्याकरिता त्यांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत . खेतीगाडी ने आतापर्यंत १० हजार वितरक साडेसहा हजार सेवा केंद्र , तीन हजार ब्रोकर आणि सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणले आहे . येत्या काळात ट्रॅक्टर बरोबरच शेतीच्या अन्य उपकरणांचीही सेवा खेतीगाडी या मंचाद्वारे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही शेवटी प्रवीण शिंदे यांनी सांगितले.