शेतीविषयक उपकरणांसाठी ' खेतीगाडी ' संकेतस्थळ

M&M tractor sales up 36 % in February

Published By : TARUN BHARAT                               February 25 , 2018

प्रतिनिधी पुणे : शेतीविषयक उपकरणांची खरेदी , विक्री तसेच उपकरणे भाड्याने देण्यासाठीच्या ' खेतीगाडी ' या वेबसाईडचे पुण्यात उदघाटन झाले . याद्वारे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर , औजारे हि रास्त भावात व एका क्लीकवर मिळतील . साताऱ्यातील योग उद्योजक प्रवीण शिंदे यांनी या संकेतस्थळाची स्थापना केली आहे . शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधीत समाजाला पेलावी लागणारी आव्हाने लक्षात घेऊन खेतीगाडीमार्फत सोपे , सोयीस्कर , सुकर अशा एकाच प्रकारचे उपाय येथे सुचवले जातात . या मंचावर सर्व प्रकारच्या ब्रँडचे व सर्वाधिक शक्तीचे ट्रॅक्टर उपलब्ध असतील शेतीशी निगडित शेकडो औजारांचा समावेशही यात आहे . या संकेतस्थळावर शेतकऱ्यांसाठी नोंदणी मोफत असून याद्वारे खरेदी , विक्री तसेच भाडेतत्त्वावर उपकरणे ते घेऊ शकतात . भारतामध्ये इंटरनेट चा वापर पूर्वी जास्त प्रमाणात नव्हता . आता याचा वापर ग्रामीण भागातही केला जातो . याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे . यासाठी खेतीगाडीच्या टीमने शेतकऱ्यांसाठी खेतीगाडी ऍप हे दहा भाषांमध्ये सुरु केले आहे , असे शिंदे म्हणाले .


Get Tractor Price

*
*

Home

Price

Tractors in india

Tractors

Compare

Review