शेतकऱ्यांसाठी उपयुक्त खेतिगाडी ऐप चे उदघाटन ट्रॅक्टर आणि शेतीविषयक उपकरणांची खरेदी - विक्री

M&M tractor sales up 36 % in February

द्वारा प्रकाशित : SAMANA                               February 23 , 2018

पुणे : ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी , विक्री आणि भाड्याने उपब्ध करून देणाऱ्या देशातील खेतिगाडी या वेबसाइड , अँड्रॉइड ऐप , वेब पोर्टलचे आज पुण्यात उदघाटन करण्यात आले . खेतिगाडी . कॉम चे संस्थापक प्रवीण शिंदे यांनी हि माहिती दिली . ते म्हणाले , शेती अधिक कार्यक्षम करण्यासाठी योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना सक्षम बनवणे , शेतकरी आणि शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेऊन शेतीगाड़ी तर्फे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे उपाय पुरवले जातात . हे उपाय शेतकरी , उतपादक , वितरक , कंत्राटदारअशा सर्वांच्या दृष्टीने उपयोगाचे आहेत . शेतीतील यांत्रिकीकरणाच्या अपुऱ्या माहितीमुळे शेतकरी अनेकदा चुकीची उतपादने वापरतात आणि त्यातून त्यांना नुकसान सहन करावे लागते . या पार्श्ववभूमीवर खेतिगाडी . कॉम तर्फे शेतकऱ्यांना योग्य उत्पदाने खरेदी करण्यासाठी तयार की जाते . हे ऐप १० प्रादेशिक भाषांमध्ये सुरु केले आहे . या पुढे १८ हिंदुस्थानी भाषांमध्ये आणि त्यानंतर जागतिक भाषांमध्येही सुरु करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले . खेतीगाडी तर्फे शेतकऱ्यांना कर्ज , अर्थ साहाय्य आणि विम्यांसारखे अर्थसाहाय्यही पुरवले जाते . आतापर्यंत १० हजार वितरक , साडेसहा हजार सेवा केंद्रे , तीन हजार ब्रोकर आणि सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना इकत्र आणले आहे . हे सर्वजण खेतिगाडीच्या मंच्याद्वारे विविध गरजा मांडत आहेत .


ट्रैक्टर कीमत जाने

*
*

होम

कीमत

Tractors in india

ट्रॅक्टर्स

तुलना

रिव्यू