खास शेतकऱ्यांसाठी 'खेतीगाडी' ची सोय

M&M tractor sales up 36 % in February

द्वारा प्रकाशित : SAKAL                               February 25 , 2018

पुणे , ता . २४ : ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी , विक्री आणि ती भाड्याने मिळवण्याची अनोखी सोय ' खेतीगाडीच्या ' रूपाने उपलब्ध झाली आहे . ' खेतीगाडी डॉट कॉम ' या नावाने असलेल्या मंचाचा प्रमुख उद्देश शेतीच्या पद्धती अधिक कार्यक्षम करण्यासाठी योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना सक्षम बनवणे हा आहे . शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधीत घटकांना पेलावी लागणारी आव्हाने समजून घेऊन ' खेतीगाडी ' तर्फे सोपे ,सोयीस्कर , सुकर ,आणि एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे उपाय पुरविले जातात . ते शेतकरी , उतपादक , वितरक , कंत्राटदार अशा सर्वांच्या दृष्टीने उपयोगाचे ठरतात . ' खेतीगाडी ' च्या मंचावर सर्व ब्रँडचे , सर्व प्रकारचे , सर्व अश्वशक्तीचे आणि सर्व क्षमतेचे ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात . अशी माहिती खेतीगाडी डॉट कॉम चे संस्थापक प्रवीण शिंदे यांनी दिली शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच ' खेतीगाडी ' ची संकल्पना विकसित करण्यात आली आहे .. योग्य उत्पादने खरेदी करता यावीत , यासाठी शेतकऱ्यांना विविध उत्पदानांची सविस्तर आणि तुलनात्मक माहितीही पुरवली जाते .


ट्रैक्टर कीमत जाने

*
*

होम

कीमत

Tractors in india

ट्रॅक्टर्स

तुलना

रिव्यू