advertisement

खास शेतकऱ्यांसाठी असलेल्या खेतीगाडी चे उदघाटन

M&M tractor sales up 36 % in February

Published By : PUNE METRO                               February 23 , 2018

ट्रॅक्टर आणि शेतीविषयक उपकरणांची खरेदी , विक्री तसेच ती भाड्याने देण्याची सुविधा असणारा जागतिक पहिलाच मंच ट्रॅक्टर तसेच शेतीविषयक उपकरणांची खरेदी , विक्री आणि ती भाड्याने मिळवण्यासाठीचा पहिला व एकमेव जागतिक मंच म्हणजे खेतीगाडी . त्याच्या देशातील सेवेचे उदघाटन पुण्यात करण्यात आले . खेतीगाडी . कॉम या नावाने असलेल्या या मंचाचा प्रमुख उद्देश आहे - शेतीच्या पद्धती अधिक कार्यक्षम करण्यासाठी योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना सक्षम बनवणे . शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधित समाजाना पेलावी लागणारी आव्हाने समजून घेऊन ' खेतीगाडी 'तर्फे त्यांना सोपे , सोयीस्कर , सुकर आणि एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे उपाय पुरवले जातात . ते शेतकरी , उत्पदक , वितरक , कंत्राटदार अशा सर्वांच्या दृष्टीने परस्परांच्या उपयोगाचे ठरतात . ' खेतीगाडी ' च्या मंचावर सर्व ब्रॅण्डचे , सर्व प्रकारचे सर्व शक्तीचे , सर्व क्षमतेचे ट्रॅक्टर्स तसेच शेतीविषयक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात . शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शेतीविषयक उपकरणे वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना शेतीच्या पद्धतीमधे जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करायला लावणे , हे खेतीगाडीचे प्रमुख प्रयोजन आहे . त्यासाठी ' खेतीगाडी ' तर्फे शेतकऱ्यांना विविध उत्पदनांची माहिती सविस्तर माहिती पुरवली जाते . त्यांना त्याचा उपयोग योग्य उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा त्याची विक्री करण्यासाठी होतो .


Get Tractor Price

*
*

Home

Price

Tractors

Tractors

Compare

Review